चहा बद्दल पत्नी ने विचारला असा प्रश्न कि… वाचा जबरदस्त जोक्स

ज्या प्रमाणे व्यक्तीला जगण्यासाठी खाणेपिणे आणि आरोग्यदायी असणे आवश्यक आहे तसेच आपले हास्य देखील आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपले एक हास्य आपले आपल्या अनेक समस्यांचा थोड्यावेळासाठी का होईना विसर पाडतो. आपल्याला आनंदित करतो. ज्याचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. चला पाहू आजचे जबरदस्त जोक्स.

पहिला जोक :
एका महिलेने ट्रैफिक सिग्नल मोडला…
पोलिसवाला – थांबा…

महिला – मला जाऊ द्या, मी एक टीचर आहे…

पोलिसवाला – अरे व्वा, या दिवसाच्या प्रतीक्षेत मी अनेक वर्षा पासून होतो…

चला… आता… लिहा… मी कधीच ट्रैफिक सिग्नल जंप नाही करणार 100 वेळा…!

दुसरा जोक : 
पत्नी : चहा नुकसान करतो का फायदा?

पती : बनवायला लागला तर नुकसान आणि तयार मिळाला तर फायदा…

तिसरा जोक :
टीचर : सगळ्यात पवित्र वस्तु काय आहे?

लक्ष्या : सर मोबाइल…

टीचर (रागावलेल्या स्वरात) : ते कसं काय?

लक्ष्या : तो बाथरूम, हॉस्पिटल, शमशान मधून आल्यावर देखील सरळ घरात, स्वयंपाकघरात आणि मंदिरात अंघोळ न करता जाऊ शकतो.

चवथा जोक :
रात्री खोलीचे कुलूप बिघडल होत.
बायको ने टॉर्च माझ्या हातात दिली आणि स्वतः टाळा उघडायला लागली.

भरपूर वेळ गेला, पण कुलूप काही उघडायचं नाव घेत नव्हता.
बायको चा पारा चांगलाच तापला…

मंग तिने टॉर्च पकडली आणि मला म्हणाली तुम्ही प्रयत्न करा…

मी प्रयत्न केला आणि कुलूप लगेच उघडलं.
बायको माझ्यावर तापली आणि म्हणाली – आता समजलं का… टॉर्च कसा पकडायचा असतो…

Leave a Comment