ज्याप्रकारे चांगली शुद्ध हवा, पौष्टिक खाणेपिणे कोणत्याही व्यक्तीला आरोग्य संपन्न राहण्यासाठी आवश्यक असते तसेच आपले हास्य हे देखील आपल्या आरोग्यासाठी तेवढेच महत्वाची भूमिका करते. जर आपण सकाळ-संध्याकाळ हसण्याची सवय स्वताला लावून घेतली तर आजार मंग ते मानसिक असो किंवा शारीरिक आपल्या पासून थोडे दूरच राहणे पसंत करतील. त्यामुळे आपण येथे आम्ही तुमच्यासाठी काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला नक्कीच हसवतील.
पत्नी सकाळी अंथरुणातून उठल्यावर सरळ आपला मेकअप करायला लागली,
तेवढ्यात पतीचे देखील डोळे उघडले.
पती – वेड लागलंय का तुला, सकाळी सकाळी मेकअप?
पत्नी – गप्प राहा थोडं, मला माझा फोन उघडायचा आहे,
फेस लॉक केला होता आणि आता तो मला ओळखत नाही आहे.
पप्पू – मित्रा मला तर अशी बायको पाहिजे आहे
जी रात्रीचे जेवण झाल्यावर म्हणेल…
तुम्ही बसून व्हाट्सअप चालवा मी पाय दाबते…
सायकल वाल्याने एका माणसाला टक्कर मारली आणि म्हणाला-
भाऊ तू तर नशीबवान आहेस…
दुसरा व्यक्ती (रागावलेल्या स्वरात) – पहिले तर तू मला टक्कर मारली आणि वरून मला नशीबवान म्हणत आहेस…
सायकलवाला व्यक्ती – हे बघ भाऊ, आज माझी सुट्टी आहे त्यामुळे सायकल चालवत आहे, नाहीतर मी ट्रक चालवतो…
मुलगा (रोमँटिक होऊन) – पिल्लू… हे बघ
मी तुझ्या केसांसाठी काय घेऊन आलो आहे.
मुलगी – कित्ती छान… काय आणलं आहेस?
मुलगा – उवा काढण्याचा कंगवा…
मित्रांनो आपल्याला वरील जोक्स आवडले असतील तर ते इतरांना सांगा. लक्षात ठेवा आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होते. त्यामुळे आपल्या मनातील गोष्टी इतरांना सांगण्यात संकोच मुळीच करू नका.